Published On : Mon, May 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खळबळ;लॉ कॉलेज चौकाजवळ किरकोळ वादातून २० वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या!

Advertisement

नागपूर : शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोडरेजच्या वादातून २० वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव तुषार सुधीर चुटे (वय २०) असे असून तो हुडकेश्वर येथील स्मृतीनगर परिसरातील वैष्णव साई अपार्टमेंटमध्ये राहत होता. तुषारचे वडील सुधीर जगदीश चुटे (वय ५०) यांनी अंबाझरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी पहाटे २ ते २.३० वाजताच्या सुमारास कॅफे हाऊस चौक ते लॉ कॉलेज चौकादरम्यान, द स्लीप कंपनीच्या शोरूमजवळ ही घटना घडली. तुषार आपल्या दोन मित्रांसह जात असताना पांढऱ्या रंगाच्या अ‍ॅक्टिव्हावरून आलेल्या दोन तरुणांशी किरकोळ कारणावरून वाद झाला.

Gold Rate
June 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,800 /-
Gold 22 KT ₹ 1,33,400 /-
Silver/Kg ₹ 2,24,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वाद वाढल्यानंतर आरोपींनी तुषारला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अ‍ॅक्टिव्हाच्या मागे बसलेल्या आरोपीने तुषारवर धारदार चाकूने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत त्याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये खून व मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. पीएसआय नंदकिशोर पडकोंडे यांनी गुन्ह्याची नोंद केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

रेशीमबाग परिसर के एक भोजनालय में हुई चोरी... #nagpurnews #crime #newsupdate #accusedarrested #stolen

रेशीमबाग परिसर के एक भोजनालय में हुई चोरी... #nagpurnews #crime #newsupdate #accusedarrested...

जीजा की गंदी नज़र ने तोड़ा रिश्तों का भरोसा... #nagpurnews #crime #newsupdate #dushkram

जीजा की गंदी नज़र ने तोड़ा रिश्तों का भरोसा... #nagpurnews #crime #newsupdate...

नागपुर में गिटार टीचर पर पोक्सो का केस  #nagpurnews #crime #newsupdate #accusedarrested #teacher

नागपुर में गिटार टीचर पर पोक्सो का केस #nagpurnews #crime #newsupdate #accusedarrested...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges