Published On : Mon, Jun 25th, 2018

नागपुरात शिवाजी महाराजांचा ३४५ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार

नागपूर : उपराजधानीत आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४५ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी शिवभक्तांची मोठी गर्दी गोळा झाली होती. त्यातच शिवभक्तांमधील उत्साह हा पाहण्यासारखा होता.यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने शहरातील महाल येथील शिवाजी पुतळ्याला पुष्पवृष्टी अर्पण करत पार पडला.

या सोहळ्याची जंगी सुरुवात सकाळी शिवाजी महाराजांची भव्य पालखी यात्रेने करण्यात आली. यावेळी ढोलताशा पथकांनी महाराजांना मानवंदना दिली. डौलाने फडकणारा भगवा आणि शिवघोषणांनी दुमदुमणारा आसमंत यात जणू शिवभक्त सर्वकाही विसरून बेभान झाले होते. यातच ‘शिवाजी महाराज की जय’ या असा घोष करत शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात पार पडला.

शिवराज्यभिषेक सोहळा समिती नागपूर च्या वतीने श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज भोंसले चा ३४५ वा शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटात नागपूर येथे साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले, अंजनगांव सुर्जी देवनाथ मठाचे मठाधिपाती प. पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज, कान्होजी राजे आंग्रे चे वंशज श्रीमंत सरखेल रघुजी राजे आंग्रे, राणीसाहेब श्रीमंत यशोधराराजे भोंसले, रामकृष्ण मठाचे स्वामी ज्ञानमृत्यानंद, शिवव्याख्याते श्री. प्रा. सुमंत टेकाडे, श्रीमंत राजे जयसिंह भोंसले इत्यादी मान्यवर उपस्तिथीत होते. यावेळी नागपूरचे लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित, मान्यवर नागरीक व हजारो शिवभक्त उपस्थित होते.