Published On : Fri, Aug 28th, 2020

कचरा डंपिंग रोडवर पडलेल्या खड्डया मध्ये बसून शिवसेना चे आंदोलन

नागपुर: संघर्ष नगर येथील वाठोडा रिंग रोड येथील कचरा डंपिंग रोडवरील प्रभाग 26 वाठोडा अंतर्गत संघर्षनगर ते भांडेवाडीत व रोडवरील जड वाहनांमुळे रस्ता खराब झाल्यामुळे, सामान्य नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणाऱ्या लोकांना खूप त्रास होत आहे ह्या सर्व समस्या मुळे, अडचणींमुळे युवासेनेचे शहर सचिव गौरव गुप्ता यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी, नारे निदर्शने, शांततेत आंदोलन करण्यात आले.

यावेळी गौरव गुप्ता म्हणाले की दररोज अपघात होत असतात, मनपा प्रशासन आणि विभागाला रस्त्याची दयनीय स्थिती लक्षात येत नाही का ? शिवसेनेचे माजी विभागप्रमुख योगेश नान्याखोर म्हणाले की, जर 15 दिवसांत रस्त्यांचे खड्डे मोकळे केले नाहीत तर स्थानिक नागरिक आणि शिवसेना, युवासेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करणार असा इशारा यावेळी दिला. आंदोलनाच्या कार्यक्रमात जे काही नुकसान होईल त्याला मनपा प्रशासन जबाबदार राहतील.

असे युवासेनेचे शहर सचिव गौरव गुप्ता यांनी म्हटले आहे. या आंदोलनात उपस्थित युवासेनेचे जिल्हा प्रमुख हितेश यादव, गौरव गुप्ता, रूपेश बागडे, शशिधर तिवारी, आकाश पांडे, हृषिकेश जाधव, पवन घुघुस्कर, अविनाश पांडे, शंकर बनारसे, शुभम भोयर, इरफान खान, प्रीतम खलोडे, योगेश ठोकर, तुळशीराम टेमेकर, अशोक शिवांकर, आणि वस्तीतील नागरिक उपस्थित होते.