Published On : Wed, Jan 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासह ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास काय होणार ?

नागपूर : राज्यातील ठाकरे-शिंदे गट यांच्यातील सत्तासंघर्षाचा महत्त्वपूर्ण निकाल आज जाहीर होणार आहे. शिंदे गटाच्या १६ आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांकडून निकाल सुनावला जाणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाकडून निकालाआधीच विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबरपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती.

20 डिसेंबर 2023 रोजी ही सुनावणी संपली. या प्रकरणात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्र दाखल करण्यात आली आहेत. तसेच आमदार आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कर्मचारी विजय जोशी, शिंदे गटाचे आमदार दिलिप लांडे, आमदार योगेश कदम, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अध्यक्षांना या प्रकरणाचा निर्णय 10 जानेवारीपर्यंत घ्यायचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार हे स्पष्ट होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले जाऊ शकते, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या 40 आमदारांना अपात्र केले जाऊ शकते किंवा शिवसेनेत फूट पडलीच नाही केवळ नेतृत्त्वात बदल झाला असे सांगत दोन्हीपैकी एकाही गटाचे आमदार अपात्र ठरणार नाहीत असाही निकाल समोर येऊ शकतो असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement
Advertisement