शिवसेना आमदारांचा गोंधळ, राजदंड पळविण्याचा प्रयत्न; झटापटीत सभापतींचे चोपदार खाली पडले

Advertisement

नागपूर- नाणार प्रकल्पावरून शिवसेना आमदारांनी प्रचंड गदारोळ केला. नागपुरात मोर्चा आल्याचा कारणावरून नाणारवर बोलू देण्याची विरोधकांनी मागणी केली. शिवसेना आमदारांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे चोपदार आणि आमदार ही खाली पडल्याची घटना घडली.

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, वैभव नाईक, राजन साळवी आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

दरम्यान, दुधाला पाच रुपये अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी 16 जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल सहभागी होणार आहे. स्वाभिमानाच्या भीतीपोटी दुधाबाबत सरकारने घोषणा केल्याचे स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तूपकर यांनी सांगितले आहे.