Published On : Mon, Jun 5th, 2023

शिवसेना-भाजप सर्व निवडणुका एकत्र लढणार : एकनाथ शिंदे

-राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. यापार्श्वभूमीवर आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

या बैठकीत पुढील सर्व निवडणुका (लोकसभा, विधानसभा आणि नागरी संस्थांसह) शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही निवडणूक लढवू आणि बहुमताने जिंकू, असे मुख्यमंत्र्यांनी शहा यांच्या भेटीच्या छायाचित्रासह ट्विट केले.

Advertisement

शिंदे आणि फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी दिल्लीत जाऊन शहा यांची भेट घेतली. शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कृषी आणि सहकाराच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील अनेक प्रलंबित प्रकल्प आता सुरळीत करण्यात आले असून ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, असे ते म्हणाले. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विविध प्रकल्पांसाठी नेहमीच मार्गदर्शन मिळाले आहे. सहकार क्षेत्रातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही शहा यांची भेट घेतली, असे शिंदे ट्विटमध्ये म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement