
नागपूर : मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षाने आज आपल्या स्थापनेची ६० वर्षे पूर्ण केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी रुजवलेले हे रोपटे आज वटवृक्ष बनले असून, राज्यभरात शिवसैनिकांकडून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत शिवसेना नागपूर लोकसभा विभागाच्या वतीने धंतोली येथील शिवसेना पूर्व विदर्भ कार्यालयात मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, वाहतूक सेना, वैद्यकीय मदत कक्ष आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
गेल्या सहा दशकांत शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली. मराठी माणसाच्या हक्कांसाठी सुरू झालेली ही चळवळ कालांतराने जनआंदोलनात परिवर्तित झाली. अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रश्नांवर भूमिका घेत शिवसेनेने जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जनसेवा, विकास आणि संघटन विस्तारावर भर देत असून, पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त नागपुरातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाद्वारे शिवसैनिकांमध्ये एकात्मता आणि पक्षनिष्ठेचा संदेश दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शिवसेना नागपूर शहराचे सामान्यक सुमुख मिश्रा यांनी सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि हितचिंतकांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
“६० वर्षांचा संघर्ष, जनतेचा विश्वास आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान” या घोषवाक्यासह शिवसेनेचा वर्धापन दिन यंदा साजरा होत आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




