Published On : Mon, Feb 6th, 2023

शितला माता मंदिर ते सदोदय प्लाझा वाहतूक बंद

मनपा आयुक्तांचे आदेश : २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक प्रतिबंधीत

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे प्रभाग क्र.19 येथील शितला माता मंदिर ते सदोदय प्लाझा पर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. सदर कामाकरीता शितला माता मंदिर ते सदोदय प्लाझा पर्यंत रस्ता कोणत्याही वाहतुकीस बंद करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. सदर आदेश ६ फेब्रुवारी २०२३ पासुन दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अंमलात राहील,असे आदेशात नमूद केले आहे.

शितला माता मंदिर ते सदोदय प्लाझा पर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीटचे काम सुरू असल्याने, नमुद रस्त्यावरील वाहतुक मेयो हॉस्पीटल ते मच्छी मार्केट या मार्गाने दुतर्फा जाईल / इतर वाहतूकं अंतर्गत रस्त्यावरून वळवण्यात येईल. दरम्यान, शितला माता मंदिर ते सदोदय प्लाझा पर्यंत जाणारा रस्ता दोन्ही बाजुने वाहतूकीस बंद करण्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी आदेशात नमूद केले आहे.

आदेशात नमूद केले आहे की, रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीगेटींगवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजुचे दुतर्फा व हतुक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ते दुभाजक तयार करुन एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतुक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतुक नियमांचे तसेच वाहतुक पोलीसंनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी. असे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement