Published On : Tue, Jul 17th, 2018

शेंडे व गायकवाड थाईलँड करीता शुभेच्छासह रवाना

कन्हान : – थाईलैंड येथे होणाऱ्या ओपन कराटे टूर्नामेंट मध्ये विविध देशातील कराटे पटु सहभागी होणार आहेत यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व दिपचंद शेंडे व विश्वजीत गायकवाड़ करणार असल्याने आम्बेडकर चौक येथे कन्हानवासियानी सत्कार समारंभासह ” विजयी भव”च्या शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले .

भारतीय कराटे संघ द्वारा आगामी थाइलैंड ओपन कराटे टूर्नामेंट करिता दिल्ली आणि बंगलोर येथे नुकतीच चाचणी घेण्यात आली होती या निवड चाचणीत कन्हान शहरातील दिपचन्द शेंडे व विश्वजीत गायकवाड़ यांची थाईलैंड येथे १८ ते २२ जुलै दरम्यान ओपन डो चैंपियनशिप करिता निवड झाली आहे.

Advertisement

दिनांक १६ जुलै २०१८ ला संघ रवाना होत असल्याने आंबेडकर चौक कन्हान येथे ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिपचंद शेंडे व विश्वजित गायकवाड़ यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला आणि कन्हान शहरासह भारत देशाचे नाव लौकिक करण्या करिता ” विजयी भव ” च्या शुभेच्छा देत रवाना करण्यात आले.

Advertisement

कार्यक्रमाचे आयोजन अजय कापसिकर मित्र परिवार तर्फे करण्यात आले. याप्रसंगी कापसीकर मित्र परिवार, बिरसा ब्रिगेड, कन्हान विकास मंच चे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मोठय़ा संख्येने युवक, कन्हान शहरवाशी उपस्थितीत होते .

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement