Published On : Fri, Aug 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मोदी सरकारच्या कामांमुळे शरद पवार यांचे मत परिवर्तन होईल ; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास

Advertisement

मुंबई- अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली, लोकशाहीत त्यांना त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट म्हणता येणार नाही, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचेही मत परिवर्तन होईल, असा सूचक इशारा दिला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार का अशा चर्चा सुरू आहेत.

Gold Rate
Sept 08,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,37,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, केंद्र सरकारच्या कामावर शरद पवार यांचे मत परिवर्तन होईल. नरेंद्र मोदींचं नेतृत्व शरद पवार मानतील, वर्षभराच्या कार्यकाळात मोदींच्या नेतृत्वात काम होणार आहे. वर्षभरात केंद्र सरकार मोठे निर्णय घेणार आहेत. या कामामुळे पवार यांच मत परिवर्तन होईल. यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मानतील असेही बावनकुळे म्हणाले. त्यामुळे बावनकुळे यांच्या विधानानंतर शरद पवार यांचे मत परिवर्तन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.