Published On : Wed, Nov 14th, 2018

शरद पवारांनी मधुकरराव पिचड यांची लिलावतीत घेतली भेट;तब्बेतीची आस्थेने केली विचारपूस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज लिलावती रुग्णालयात जावून भेट घेत तब्बेतीची आस्थेने विचारपूस केली.

मुंबईच्या लिलावती रुग्णालयामध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड उपचार घेत असल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तिथे जावून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.तिथे गेल्यावर बराचवेळ त्यांनी पिचड यांच्या तब्बेतीची आस्थेने चौकशी करत त्यांना काळजी घ्यायला सांगितले

याचवेळी त्यांना आमदार हनुमंत डोळस आणि माजीमंत्री उदय सामंत यांच्या मातोश्री लिलावतीमध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी जावून त्यांच्याही तब्बेतीची आस्थेने विचारपूस केली.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार वैभव पिचड उपस्थित होते.