Published On : Wed, Nov 15th, 2017

कार अपघातातील जखमींच्या मदतीला खुद्द शरद पवार धावले

Advertisement

नागपूर/गडचिरोली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याचं चित्र पाहायला मिळालं. गडचिरोली दौऱ्याच्या वेळी पवारांनी कार अपघातातील जखमींना मदत केली.

शरद पवार गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरहून गडचिरोलीला जाताना भिवापूरजवळ एका गाडीला अपघात झालेला होता. अपघाताचं दृश्य पाहून पवारही थबकले आणि त्यांनी स्वत: गाडीतून उतरुन जखमींना मदत केली.

अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली. गाडीत अडकलेल्या पाच जणांच्या कुटुंबाला शरद पवारांनी बाहेर पडायला मदत केली.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मदतीनंतर पवार आपल्या दौऱ्यावर रवाना झाले. मात्र हे दृश्य पाहून अनेकांनी राजकीय क्षेत्रातील माणसाचं दर्शन घडल्याच्या भावना व्यक्त केल्याचं म्हटलं जातं. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

Advertisement
Advertisement