Published On : Fri, Feb 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

शरद पवार गटाला मिळाले नवे चिन्ह; ‘तुतारी’ वर अखेर शिक्कामोर्तब !

Advertisement

नागपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अखेर पक्षचिन्ह बहाल केले आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह दिले आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर र शरद पवार गटाला कोणते नाव किंवा चिन्ह मिळणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत तुतारी हे पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहणार आहे.तुतारी हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.

एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!”, अशी केशवसुतांची कविता पक्षाच्या अधिकृत खात्यावरून पोस्ट करण्यात आली आहे. तसंच, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे, अशी पोस्ट पवार गटाने लिहिली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.