Published On : Fri, Sep 22nd, 2017

शाहीर माणिकराव देशमुख यांच्या गम्मतीत श्रोते मंत्रमुग्ध.

कन्हान : बाल गणेश उत्सव मंडळ, एंसबा (नांदगाव ) च्या वतीने दरवर्षी गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. रविवारी ला दिवसा आयोजित शाहीर माणिकराव देशमुख यांचा खडीगम्मतीचा कार्यक्रमात परिसरातील ग्रामस्थाचे आधुनिक प्रबोधन करून मस्क-या गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

बाल गणेश उत्सव मंडळ एंसबा (नांदगाव ) ता पारशिवनी च्या वतीने शनिवार दि. ९/९/२०१७ ला श्री गणेश मुर्तीची स्थापना करून गणेश उत्सवाची सुरूवात करण्यात आली.शनिवार दि. १६/०९/२०१७ ला ह भ प विठ्ठल महाराज मु देवळी यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला. गावक-यांचे व परिसरातील नागरिकांचे मनोरंजनातुन प्रबोधना करिता विदर्भातील प्रसिद्ध शाहीर माणिकराव देशमुख भाऊ शिवदास मु. मोहाडी ( कुचाडी ) यांचा खडी गम्मंतीचा कार्यक्रम रविवार दि. १७/९/२०१७ ला दिवसा आयोजित केला होता. यात शाहीर माणिकराव देशमुख हयानी वाईट प्रथा, वाईट व्यसन, अंधश्रद्धा निर्मूलन,वृक्षांचे संर्वधन, ग्राम स्वच्छता या विषयावर मनोरंजनातुन मार्मिक प्रबोधन केले. या खडी गम्मतीच्या कार्यक्रमाने परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थ श्रोते मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला.

सोमवार दि. १८/ ०९/२०१७ ला दुपारी ४ वाजता पासुन महाप्रसादाचा परिसरातील भाविकांनी लाभ घेतला . मंगळवार (दि.१९)ला सायंकाळी ६ वाजता श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करून मस्क-या गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता बाल गणेश उत्सव मंडळ एंसबा (नांदगाव) चे आशिष मोहुर्ले, रोशन काळे, स्वप्निल सोनेकर, सुरज मारबते, रोशन राऊत, राहुल काळे, अक्षय मोहुर्ले, प्रदिप सोनेकर, मनोज गोंडाणे, आकाश मोहुर्ले, सौरव काळे, सुरज पाटील, सुरज काळे, राकेश गोरले, दिनेश राऊत, माजी सरपंच दिंगाबर ठाकरें, खुशाल मोहुर्ले, लक्ष्मण काळे,गोपाल गि-हे, अर्जुन काळे, भाऊराव ठाकरे, राजु राऊत, भगवान मोहुर्ले, रवी झाडे, श्रीधर ठाकरे, वसंता महल्ले, शेषराव ठाकरे, खुशाल मारबते, संजय ठाकरे, अशोक नेवारे, तुकाराम राऊत, दिलीप मारबते, अनिल काळे, बाबाराव ठाकरे, प्रकाश काळे, दिपक ठाकरे, नामदेव सोनेकर, गोंविदा वानखेडे, हेमराज मोखरकर, देविदास मोहुर्ले, देवराव ठाकरे, गोंविदा मोहुर्ले, यादवराव काकडे व समस्थ गावक-यांनी अथक परिश्रम घेतले.