Published On : Sun, Nov 24th, 2019

शहीद गोवारी बांधवांना मनपातर्फे आदरांजली

नागपूर, : हिवाळी अधिवेशनावर आपल्या मागण्यासाठी २५ वर्षांपूर्वी काढलेल्या मोर्चामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ आदिवासी गोवारी बांधव शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त झिरो माईल येथे असलेल्या शहीद गोवारी स्मारकावर महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनिषा कोठे आणि सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने आदी उपस्थित होते.