Published On : Thu, Jun 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरमध्ये सेक्सटॉर्शन प्रकरणाचा पर्दाफाश;बिहारमधून २० वर्षीय तरुण अटकेत,५० लाखांची फसवणूक!

Advertisement

नागपूर – शहरातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. नागपूरच्या २५ वर्षीय तरुणाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील २० वर्षीय सुंदरकुमार कुंदनकुमार सिंह या तरुणाला अटक करण्यात आली असून तो फक्त दहावी नापास आहे. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून अशा प्रकारच्या फसवणुकीत तो प्रवीण असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

अश्लील चॅटिंग आणि ब्लॅकमेलिंगचा कट-
तक्रारदार तरुणाचा संपर्क जानेवारी महिन्यात एका युवतीशी व्हॉट्सअ‍ॅपवर झाला. तिने स्वत:ला दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी म्हणून ओळख दिली आणि अश्लील चॅटिंग सुरू झाली. काही दिवसांतच दोघांत अश्लील फोटो आणि व्हिडिओंचा आदानप्रदान झाला. त्यानंतर त्या फोटोंचा वापर करत तरुणाला ब्लॅकमेल करण्यात आले. ‘हे फोटो व्हायरल करू’ अशी धमकी देत वेळोवेळी त्याच्याकडून पैसे उकळले गेले. एकूण ४९ लाख ३४ हजार रुपये या तरुणाकडून उकळण्यात आले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपी बिहारहून नागपूरला आणला-
या प्रकाराला कंटाळून पीडित तरुणाने अखेर सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ४ मे रोजी नागपूर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासात या प्रकरणाचा सूत्रधार सुंदरकुमार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले आणि आरोपीला अटक करून नागपूरला आणण्यात आले.

अजून बरेच आरोपी उघड होण्याची शक्यता-
सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणकोण सामील आहेत, याचा शोध घेतला जात आहे. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

Advertisement
Advertisement