Published On : Wed, Oct 3rd, 2018

नागपुरात फ्लॅटमध्ये सापडले आंतरराज्यीय सेक्स रॅकेट

नागपूर : गुन्हे शाखेच्या एसएसबीने जरीपटका येथील एका अपार्टमेेंटमध्ये सुरु असलेला देहव्यापाराचा आंतरराज्यीय अड्डा उघडकीस आणला. पोलिसांनी या अड्ड्याच्या सूत्रधाराकडून मुंबई आणि कोलकात्याच्या तरुणींना मुक्त केले.

निकिलेश केशव मुदलीयार (३०) रा. मनीष सोसायटी, काटोल रोड असे या अड्ड्याच्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. निकिलेश अनेक दिवसापसून देहव्यापाराच्या अड्डा चालवतो. त्याला दीड वर्षापूर्वी सुद्धा एसएसबीने मानकापूर येथे रंगेहात पकडले होते. यानंतर त्याने पुन्हा देहव्यापारचा अड्डा सुरु केला होता. पोलिसांना याची माहिती मिळाली. तो जरीपटका येथील तथागत चौकाजवळ असलेल्या अपूर्वा अपार्टमेंटमध्ये हा अड्डा चालवित होता.

एसएसबीने बुधवारी सायंकाळी एक डमी ग्राहक निकिलेशच्या अड्ड्यावर पाठवला. त्याने ५ हजार रुपयात एका तरुणीचा सौदा केला. ग्राहकाकडून संकेत मिळताच पोलिसांनी धाड टाकली. त्याच्या अड्ड्यावर मुंबई आणि कोलकाता येथील प्रत्येकी एक तरुणी सापडली. या तरुणी दिल्लीच्या दलालाच्या माध्यमातून निकिलेशच्या संपर्कात आल्या होत्या. सूत्रानुसार मुंबईतील तरुणी १० दिवस आणि कोलकात्यातील तरुणी ५ दिवसाच्या करारावर नागपुरात आणल्या गेली होती. त्यांना १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. या मोबदल्यात त्यांना २४ तासात ७ ग्राहकांना सेवा द्यायची होती.

सूत्रानुसार निकिलेश देहव्यापार क्षेत्रातील दिग्गज नाव आहे. त्याच्याकडे ग्राहकांची लांबलचक यादी आहे. तो थेट ग्राहकांशी संपर्क साधून किंवा आॅनलाईनसुद्धा हा धंदा चालवतो. तो दुपारच्या वेळी सेवा देण्यासाठी ग्राहकाकडून १० हजार रुपयापर्यंत वसूल करतो. रात्रीसाठी १५ हजार रुपये घ्यायचा. तो ग्राहकांना फ्लॅटवर बोलावण्यासोबतच तरुणींना ग्राहकासोबत बाहेरही पाठवायचा. फार्म हाऊस आणि हॉटेलमध्ये होणाऱ्या पार्ट्यांमध्येही तो मुली उपलब्ध करून द्यायचा. शेजारी राज्यांपर्यंत त्याचे नेटवर्क पसरले आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि इतर दस्तावेज जप्त केले आहे.

पोलिसांनी गेल्या दहा दिवसात देह व्यापाराचे ११ अड्डे उघडकीस आणले. एसएसबीने ६ अड्ड्यांवर धाड टाकली. तर झोन दोन व पाचने सुद्धा अशीच कारवाई केली. या धाडीमुळे देह व्यापार चालवणाºयांचे धाबे दणाणले आहे.

ही कारवाई एसएसबीचे निरीक्षक विक्रम सिंह गौड, एपीआय संजीवनी थोरात, पीएसआय स्मिता सोनवणे, एएसआय दामोदर राजुरकर, हवालदार शीतला प्रसाद मिश्रा, मुकुंदा गारमोडे, मनोज सिंह, संजय पांडे, प्रफुल्ल बोंद्रे, प्रल्हाद डोळे, कल्पना लाडे, अस्मिता मेश्राम, अर्चना राऊत, अनिल दुबे आणि बळीराम रेवतकर यांनी केली.