Published On : Thu, Nov 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

“सेक्स अँड द सिटी” ; नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देह व्यापार तेजीत, रेडलाईट परिसर गजबजले !

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटॅलिटी उद्योग तेजीत असताना शहरातील रेडलाईट परिसर गजबजले आहेत. उच्चस्तरीय रिसॉर्ट्स, फॉरेस्ट बंगल्यापासून ते गंगा जमुनामधील रूम्सपर्यंत झगमग पाहायला मिळत आहे. बेंगळुरू, कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि अगदी पूर्वीच्या पूर्व सोवियत ब्लॉक देशांतून सेक्स वर्कर्सच्या अचानक येण्याने व्यवसायाला वेग आला आहे, असे उच्च पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

डिसेंबरमध्ये येणारी थंडी आणि पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देह व्यापार सर्किटमध्ये तापमान वाढताना दिसत आहे. बहुतेक शीर्ष हॉटेल्स बुक केलेली असताना, स्पा, मसाज पार्लर आणि सलून येत्या आठवड्यांमध्ये व्यवसायाच्या शिखरावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील एजंट, विशेषत: जरीपटका, रामदासपेठ, धंतोली इत्यादी ठिकाणी देहव्यापार करणाऱ्या महिलांना घेऊन जातात. उद्योगपती आणि राजकारण्यांसह सर्वोत्कृष्ट ग्राहकांना या महिला सेवा देतात.या बदल्यात महिलांना आणि एजंटला भरपूर पैसे दिले जातात.

गंगा जमुना येथील एका स्रोताने सांगितले की, अधिवेशनदरम्यान रेडलाईट परिसर गजबजलेला असतो. कारण अधिका-यांसह चालक, नोकर आणि सफाई कामगारांसह खालच्या दर्जाचे सरकारी कर्मचारी येथे नियमित ग्राहक आहेत. अगदी छोटे मोठे नेते त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सहाय्यक कर्मचारी गंगा जमुना येथे येत असतात. यादरम्यान होणाऱ्या गर्दीला स्थानिक भागात ‘अधिवेशन गर्दी’ म्हणून संबोधित केले जाते.

आता विघटित झालेल्या सोव्हिएत युनियनमधील फॉरेनर महिलांना ‘रशियन’ म्हणून ओळखले जाते, त्यांना सर्वाधिक मागणी आहे. या काळात या महिलांना सर्वाधिक मागणी असल्याची माहिती आहे.

बनावट आधार आणि पॅनकार्डच्या सहाय्याने ते टॉप हॉटेल्समध्ये भारतीय असल्याचा मुखवटा मिरवतात.कारण या महिलांना जास्त किंमत मिळत असते. शहराच्या बाहेरील भागात फार्महाऊस आणि दूरच्या रिसॉर्ट्समधील खाजगी पार्ट्यांमध्ये त्या बेली डान्सर म्हणूनही काम करतात, अशी माहिती एका उज्ज स्रोताने सांगितली. डीसीपी, गुन्हे, मुम्माका सुदर्शन यांनी सांगितले की, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पोलीस हाय अलर्टवर आहेत.

“आम्हाला देहव्यापार संदर्भात कोणतीही तक्रार किंवा विश्वसनीय सूचना मिळाल्यास, कारवाई सुरू केली जाईल. याबाबत नागरिक पुढे येऊन पोलिसांसोबत इनपुट शेअर करू शकतात. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. एका सूत्रानुसार, समलैंगिक, द्वि-लैंगिक आणि ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर्सची मागणीही वाढते आणि ते खूप पैसे कमवतात. हे पाहत डिसेंबरमध्ये नागपूर शहारत आंबट शौकीनच्या आनंदाचे प्रमाण निश्चितच काही अंशांनी वाढणार आहे.
image.png

Advertisement
Advertisement