Published On : Tue, Jul 28th, 2020

वडगाव जलाश्याचे सात गेट उघडले 75 टक्के जलसाठा 301. 34 क्युसेस पाणी विसर्ग

Advertisement

बेला दिलीप घिमे वेणा नदीवरअसलेल्या विदर्भातील नामांकित जलाशयातील एक जलाशय बेला (तालुका उमरेड) शिवारातील वडगाव जलाशय 22 गेट असलेले जलाशय आहे त्यामध्ये नागपूर पासून पाण्याची आवक येत असते त्यामुळे 75 टक्के भरले आहे पावसाची शक्यता असल्याने तसेच जलाशयात पाण्याची अभाव सुरू असल्याने त्यातील जलसाठा 65 टक्के वर आणण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे.

त्या अनुषंगाने या जलाशयाचे सात गेट7. 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून त्यात 301. 34 क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कुलकर्णी यांनी दिली

वेना नदीच्या उगमाकडे दमदार पाऊस कोसळल्याने वडगाव जलाशयाची पाण्याची आवक वाढली आहे मागच्या आठवड्यात यातील पाणीसाठा 75 टक्के झाला हा साठा कमी करण्यासाठी पंधरा दिवसापूर्वी या धरणाची तीन गेट 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले होते नंतर ते बंद करण्यात आले पाण्याच्या विसर्गाच्या तुलनेत आवक थोडी अधिक असल्याने पाणी साठा वाढत होता त्यामुळे गुरुवारी 23 तारखेला दुपारी 3 वाजता तीन गेट 20 सेंटिमीटरने आणि शुक्रवारी 24 तारखेला दुपारी 4 वाजता गेट 7. 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले या गेटमधून 301.34क्यूसेस पाणी विसर्ग होत आहे पावसाचा अंदाज आणि पाण्याची आवक लक्षात घेता या धरणातील पाणीसाठा 65 टक्‍क्‍यावर आणण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती कार्यकारी अभियंता हेमंत कुलकर्णी यांनी दिली

तुषार मुथाल