Published On : Fri, Sep 20th, 2019

दिनांक 20 सप्टेंबर 2019 अर्थ व सां‍ख्यिकी विभागाचे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तक प्रकाशित

नागपूर: जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने ‘जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -2018’ चे पुस्तक प्रकाशित केले आहे. जिल्ह्याची सामाजिक व आर्थिक क्षेत्रांची तालुकानिहाय एकत्रित माहितीचा समावेश या पुस्तकात आहे. वार्षिक पुस्तिका जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना जिल्हा सांख्यिकी अधिकारी राजीव कळमकर यांनी आज दिली.

‘जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन’ च्या माध्यमातून जिल्हृयातील विविध सामाजिक व आर्थिक क्षेत्रांच्या स्थितीबाबतची जिल्ह्याची तालुकानिहाय आकडेवारी देण्यात आली आहे.

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन या प्रकाशनात जिल्हृयातील महत्त्वाच्या बाबी, जिल्हा उत्पन्न अंदाज, किंमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था, जमीन व इतर महसूल, सार्वजनिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न व खर्च, बँक व विमा, बचतगट यांच्या टक्केवारीसह माहितीचा समावेश आहे. तसेच कृषी, पदुम, जलसंपदा व लाभक्षेत्र, वने व पर्यावरण, उद्योग व सहकार, रोजगार व स्वयंरोजगार,कामगार, सहकार, पणन या विभागातील माहितीचा अंतर्भाव आहे. वस्त्रोद्योग, ऊर्जा, प्रादेशिक परिवहन व दळणवळण, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा व स्वच्छता, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, विकास, विशेष सहाय्य, मदत व पुर्नवसन, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, न्याय व प्रशासन, माहिती व जनसंपर्क, निवडणूक, महसूल, पर्यटन, जनगणना, कृषी, पशू तसेच आर्थिक गणना या विषयांवरील माहिती त्याचप्रमाणे विविध विकास योजना विषयक आकडेवारीचा देखील या प्रकाशनामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

‘जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन’ माहिती पुस्तिका अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक कृष्णा फिरके व जिल्हा सांख्यिकी अधिकारी राजीव कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. ही माहिती पुस्तिका https://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. या माहितीच्या आधारे विविध प्रशासकीय विभाग, कार्यालयांना नियोजनाकरिता आकडेवारी उपलब्ध होते. संशोधन, विद्यार्थी, विविध अशासकीय संस्था, संघटना यांना अभ्यासाकरिता यातील माहिती अत्यंत उपयोगी आहे.