नागपूर : नागपूरच्या पत्रकारितेतील ज्येष्ठ व अनुभवी नाव असलेले शरद रोटकर यांचे वयाच्या 79 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने नागपूर व विदर्भ पत्रकारितेतील एक महत्वाचा आधारस्तंभ हरपला आहे.
रोटकर यांनी अनेक दशके विविध माध्यमांतून काम करताना समाजातील प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, स्थानिक घडामोडी तसेच राज्य-राष्ट्रीय घडामोडींवर सखोल आणि अभ्यासपूर्ण लेखन केले. साध्या, सोप्या आणि परखड शैलीमुळे ते वाचक व प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले. त्यांनी हितवाद, इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र टुडे या सारख्या वृत्त माध्यमात काम केले आहे.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी असंख्य तरुण पत्रकारांना मार्गदर्शन केले. पत्रकारितेतील सचोटी, मेहनत आणि प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले.
ज्येष्ठ पत्रकार शरद रोटकर यांच्या निधनामुळे नागपूर प्रेस क्लब आणि पत्रकार बांधवांत हळहळ व्यक्त होत आहे. विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!