Published On : Wed, May 22nd, 2019

ज्येष्ठ नागरिकांचा भव्य हिरक महोत्सव सोहळा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

कामठी: आई वडिलांचे ऋण फेडण्यासाठी आणि समाजाप्रती एक बांधिलकी म्हणून सेवानिवृत्त सेवक संघ जे कार्य करीत आहे हे उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी असल्याचे मौलिक प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष कामठी चे सेवानिवृत्त सहाययक पोलीस उपायुक्त गोपाल यादव यांनी व्यक्त केले.

ते सेवानिवृत्त सेवक संघ कामठी , नागपूर च्या वतीने कामठी येथील सिध्दार्थ बौद्ध विहार , भीम पटांगण मध्ये आयोजित ज्येष्ठ नागरिकांचा भव्य हिरक महोत्सव सोहळा कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक संचालक शरद धनविजय,तर प्रमुख उपस्थितीत जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे,ऍड भीमा गेडाम, सेवानिवृत्त सेवक संघाचे संस्थापक नानाजी वासनिक, संघाचे अध्यक्ष प्रा दुर्योधन मेश्राम, सचिव प्रदीप फुलझेले आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी 35 ज्येष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ तसेच मोमेंटो भेट देऊन गौरविण्यात आले यामध्ये विशेषता 99 वर्षाचे देवाजी भीमटे यांच्या शुभ हस्ते केक कापून गौरणविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा दुर्योधन मेश्राम , मंच संचालन मूलचंद शेंडे यानि केले तर आभार प्रदर्शन शशिकांत चिमनकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसेवानिवृत्त सेवक संघाचे भाऊराव वासनिक, भीमराव गजभिये,माणिक सूर्यवंशी, शिवशंकर गजभिये, उमाकांत चिमनकर, अशोक मंडपे, सुरेश गजभिये, पांडुरंग मेश्राम, अनुपचंद कांबळे, आदींनी मोलाची कामगिरी राबविली.

– संदीप काम्बले, कामठी