Advertisement
नागपूर : शहरातील सोनेगाव येथील प्रसाद सोसायटीत राहणारे जेष्ठ नागरिक लिखार काका यांनी भर चौकात आंघोळ करत नागपूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून लिखार काका यांच्या घरातील सीवेज लाइन चोक झाली. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याबाबत त्यांनी लक्ष्मीनगर झोन मध्ये जाऊन तक्रार केली. मात्र त्यांच्या तक्रारीची प्रशासनाने काहीच दखल घेतली नाही.
नागपूर महानगरपालिकेच्या उदासीन आणि निष्क्रिय कारभाराचा निषेध करत नाईलाजास्तव लिखार काका यांनी शेवटी भर चौकात अंघोळ केली. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांना काय त्रास होतो याच्याशी काही देणे घेणे नाही… शेवटी जेष्ठ नागरिकांनी आपली समस्या घेऊन कुठे जावे व लोकप्रतिनिधींनी काय करावे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.