Published On : Mon, Aug 19th, 2019

प्रभाग क्रमांक दोन मध्ये स्वखर्चाने निस्वार्थ सेवा

कन्हान – नगरपरिषद अंतर्गत आरोग्य व स्वच्छता कंत्राटदाराच्या स्वच्छता कर्मचा-यांना भविष्य निधी कपात करून योग्य वेतन महिन्याच्या १० तारखेला नियमित मिळत नसल्याने स्वच्छता कर्मचा-यांचे दहा दिवसापासुन कामबंद आंदोलनामुळे कन्हान शहरात अस्वच्छते चे साम्राज्य पसरल्याने रोगराई फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे कुठला मार्ग मिळत नसल्याने प्रभाग क्रमांक दोन येथे सामाजिक कार्यकर्ता विनय सुनिल यादव हे प्रभागात मध्ये फिरत असताना सुध्दज्ञ नागरीकानी यादव यांच्या कडे घाणीचे साम्राज्य व कचराचे विलेलेवाट लावण्या करीता विनती केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रभागात नागरीकांना आश्वासन दिले व स्वतःच स्वखर्चानी मजदूर व टाॅली टेक्टर घेऊन नागरीका सोमर मदतीला धावून
नागरिकाचा मदतीने प्रभाग क्रमांक दोन मधील घरात घरातून व परिसरातील साठवलेला कचरा उचलून परिसरातील नागरीकाची दुगधी पासून सुटका केली. त्यामुळे परिसरातील नागरीकानी निस्वार्थ केलेल्या कामातून बद्दल प्रशंसा केली.