Published On : Mon, Aug 19th, 2019

ट्रक अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव मार्गावरील मंगेश फॅमिली रेस्टारेंट अँड ढाबा समोर हैद्राबाद हुन नागपूर कडे कपडे लादून घेऊन जाणाऱ्या वाहन क्र एन एल 01 एसी 4487 च्या चालकाने समोरील वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या अपघातात ट्रक ची स्टेरिंग ट्रेकचालकाच्या छातीत गेल्याने ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल मध्यरात्री दरम्यान घडली असून मृतक ट्रकचालकाचे नाव सुभाषचंद्र बाबुराम यादव वय 45 वर्षे रा.कननोज उत्तरप्रदेश असे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शास्कोय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.