Published On : Sat, Jul 7th, 2018

सध्या देशातील विशिष्ट लोकांना इतरांवर हल्ला करण्याचा अलिखित अधिकार मिळालाय- शरद पवार

मुंबई: देशातील सध्याची परिस्थिती पाहता समाजातील काही लोकांना इतरांवर हल्ला करण्याचा अलिखित अधिकार मिळाला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, एखाद्याकडे सामर्थ्य असेल तर त्याने समाजात बंधुभाव टिकवून सर्वांना विकासाच्या वाटेवर नेले पाहिजे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत तसे घडताना दिसत नाही, असे पवारांनी म्हटले. सध्या समाजात अनेक लोकांवर हल्ले होत आहेत.

यामध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदाय बळी पडत आहे. जणुकाही समाजातील काही लोकांना इतरांवर हल्ला करण्याचा अधिकार मिळाला आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.