
वॉशिंग्टन : माजी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या खुलाशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवली आहे. त्यांनी दावा केला आहे की, “पाकिस्तान सध्या गुप्तपणे अणु चाचण्या करत आहे.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे भारतातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “जगातील अनेक देश अणुबॉम्बच्या चाचण्या करत आहेत, पण त्याबद्दल ते बोलत नाहीत. रशिया आणि चीन नियमितपणे चाचण्या करतात, मात्र त्या गोपनीय ठेवल्या जातात. आम्ही अमेरिकन लोक वेगळे आहोत. आम्ही खुल्या समाजात जगतो, त्यामुळे आम्हाला हे सांगावंच लागतं.”
ट्रम्प पुढे म्हणाले, “उत्तर कोरिया नक्कीच अणु चाचण्या करत आहे आणि पाकिस्तानही त्या करत आहे. त्यामुळे आम्हीही चाचण्या करणार आहोत. जेव्हा इतर देश चाचण्या करतात, तेव्हा आम्ही शांत राहू शकत नाही.”
गौरतलब आहे की, पाकिस्तानने अधिकृतरीत्या शेवटचं अणु परीक्षण १९९८ मध्ये केलं होतं. मात्र, ट्रम्प यांच्या दाव्यानुसार पाकिस्तान त्यानंतरही गुप्तपणे अणु चाचण्या करत आहे. त्यांनी असेही नमूद केले की, “रशिया आणि चीन देखील भूमिगत चाचण्या करत आहेत, ज्या सामान्य लोकांना लक्षातही येत नाहीत.”
सीबीएसच्या ‘६० मिनिट्स’ या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं, “रशिया आणि उत्तर कोरिया त्यांच्या अण्वस्त्र प्रणालींच्या चाचण्या करत आहेत. त्यामुळे अमेरिकेलाही ३३ वर्षांनंतर अणु परीक्षण पुन्हा सुरू करावं लागेल.”
अमेरिकेने शेवटचं अणु परीक्षण १९९२ मध्ये केलं होतं. त्यानंतर शीतयुद्ध संपल्याचं घोषित करण्यात आलं होतं. पण आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पेंटागनला आदेश दिला आहे की, “रशिया आणि चीनच्या हालचालींना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही आपल्या अण्वस्त्रांची चाचणी सुरू करावी.”
या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांच्या खुलाशामुळे भारतासाठीही ही गंभीर बाब ठरू शकते, कारण पाकिस्तानकडून पुन्हा अणु चाचण्या होत असल्यास दक्षिण आशियात अण्वस्त्र संतुलन धोक्यात येऊ शकते.








