Published On : Tue, Aug 16th, 2022

एसडीओ सवंगपते व्दारे शेतात विजे पडुन मुत्यु महिलेच्या मुलाना दोन सायकल भेट

Advertisement

उपविभागीय अधिकारी रामटेक मा. वंदना सवंगपते च्या वतीने सायकल व आर्थिक मदत.

कन्हान : – निलज (खंडाळा) शेत शिवारात विज पडुन शेतमजुर नंदाबाई खंडाते चा मुत्यु झाल्याने शासना तर्फे आर्थिक मदत करण्यात तर आलीच, त्याच प्रमाणे रामटेक उपविभागीय अ़धिकारी मा. वंदना सवंगपते हयानी मानुष्की जपत मुत महिलेच्या दोन्ही मुलाना सायकल भेट दिली तर दुसरी जख्मी महिला रेखा चौधरी हिला सुध्दा आर्थिक मदत करून भारताचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सोव साजरा केला.

सोमवार (दि.१५) ऑगस्ट २०२२ ला भारतीय ७५ वा स्वातंत्र्या अमृत महोत्सवी कार्यक्रम उपविभागी य कार्यालयात थाटात साजरा करित दुपारी १ वाजता पारशिवनी तालुक्यातील निलज (खंडाळा) ग्राम पंचा यत येथे छोटे खानी क्रार्यक्रम घेऊन गुरूवार (दि.४) ऑगस्ट ला निलज शेत शिवारात विज पडुन मुत्यु झालेल्या शेतमजुर नंदाबाई रामकृष्णा खंडाते यांच्या मुलगा तन्मय रामृष्णा खंडाते व आयुष रामकृष्ण खंडाते याना दोन सायकल भेट दिली तर जख्मी महि ला रेखा मुकेश चौधरी हिला सुध्दा आर्थिक मदत करू न अधिका-याना सुध्दा माणुष्कीचे काळीज असते, अधिकारी सुध्दा समाजातील घटक असतो ते या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी प्रत्यक्ष कार्यातुन प्रगट केले.

याप्रसंगी मा. वंदना सवंगपते उपविभागिय अधिकारी रामटेक, मा. प्रशांत सांगोडे तहसिलदार पारशिवनी, मा. व्यकटराव कारोमोरे सदस्य जि प गोंडेगाव-साटक सर्कल, नरेश मेश्राम पं स सदस्य, आशाताई पाहुणे सरपंचा निलज, पंकज टोहणे उप सरपंच, रामेश्वर चरडे ग्रा प सदस्य, कवडु खंडाते ग्रा प सदस्य, धनराज चकोले ग्रा प सदस्य, सुर्यकांता चकोले ग्रा प सदस्या, निताबाई पाहुणे ग्रा प सदस्या, मनोज कटारे ग्रामसेवक, जयराम मेहरकुळे, रामकृष्णा खंडाते, भिमराव शिंदेमेश्राम, मुलचंद खंडाते, रोशन पाहुणे, मनोज टोहणे, नागेश्वर कारेमोरे सह बहु संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

रामटेक उपविभागीय अ़धिकारी मा.वंदना सवंगपते व तहसिलदार मा प्रशांत सांगोडे यांचे या मौलिक कार्याबद्दल ग्रा प निलज (खंडाळा) सरपं चा आशाताई पाहुणे व उपसरपंच पंकज टोहणे, सर्व ग्राप सदस्य आणि ग्रामस्थानी आभार व्यकत केले.