Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Aug 26th, 2020

  रेल्वे कॉलनीतच भंगार व्यवसाय

  – रेल्वे गार्ड लाईन कॉलोनीत प्रकार,रेल्वे प्रशासनासह सुरक्षा व्यवस्था निद्रेत

  नागपूर- मोकळी जागा दिसली की अतिक्रमण झालेच म्हणून समजा, अशी स्थिती उपराजधानीत आहे. आतापर्यंत रेल्वेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचे एैकन्यात आहे. आता तर चक्क अतिक्रमणकारी रेल्वे कॉलनीत शिरले. येवढेच काय तर त्या ठिकाणी चक्क भंगार व्यवसाय सुरू केला. मागील अनेक महिण्यांपासून हा व्यवसाय सुरू असला तरी रेल्वेची सुरक्षा व्यवस्था कुठल्याही प्रकारची हालचाल करताना दिसून येत नाही. त्यामुळे अतिक्रमण करणाèयांची qहमत वाढतच आहे. रस्त्या व्यापला. जागा व्यापली, आलमारीचे कारखाने उभारले. आता कबाडीचा व्यवसाय चांगलाच फोफावत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाचे कमालिचे दुर्लक्ष होताना दिसते. ही स्थिती रेल्वे गार्ड लाईन कॉलनीत आहे.

  मध्य रेल्वे नागपूर विभागातील रेल्वे कर्मचाèयांनाच्या निवासासाठी अजनी आणि गार्ड लाईन, सिविल लाईन परिसरात कॉलनी आहेत. यात प्रामुख्याने अजनी ही मोठी वसाहत आहे. त्यानंतर गार्ड लाईनची रेल्वे कॉलोनीही मोठी आहे. गार्ड लाईन जवळच लोकोपायलट आणि गार्डला आराम करण्यासाठी त्रिवणी रेस्ट हाउस आहे. त्रिवेणी समोरच रेल्वे इन्स्टिट्युट आहे आणि इस्टिट्युटच्या २०० मीटर समोरच (त्याच रो मध्ये) असलेल्या रेल्वे क्वॉर्टरमधील मोकळ्या जागेत चक्क मोठ्या प्रमाणात भंगार व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. अगदीच वळनावर असलेल्या क्वॉर्टरमध्ये भंगार आहेत. जुने भंगार असलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी आहेत. आधीच रस्ता कमी, वाहनांची वर्दळ त्यातही रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी भंगार वाहन गेल्या कित्येक दिवसापासून असल्याने वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.

  यामार्गावरून संत्रा मार्केटकडे, रेल्वे स्थानकाकडे आणि मेयो रुग्णालयाकडे रस्ता जातो. त्याच प्रमाणे एक रस्ता मोमीनपुèयाकडेही जातो. रस्त्यावरच अतिक्रमण असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होते.

  कोलकाता रेल्वे मार्ग असलेल्या मोतीबाग आरयूबी पुलाजवळच असलेल्या काही भंगार विक्रेत्यांनी आपले भंगार चक्क गार्ड लाईन कॉलोनीच्या कंपाऊंड वॉलमध्ये ठेवले आहे. गेल्या कित्येक दिवसापासून हा प्रकार सुरू आहे. मात्र मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाèयांना हे दिसत नाही. सुरवातीला या भंगार विक्रेत्याचे लहान लहान दुकाने होते. रेल्वे qकवा मनपाकडून कुठल्याची प्रकारची कारवाई न झालयामुळे दुकान आणि अतिक्रमण वाढत गेले. आता तर भीतीच उरली नसल्याने रेल्वे कॉलोनीतील कंपाऊंड वॉलच्या आतच आपले भंगार सामान ठेवण्यास सुरवात केली. गेल्या कित्येक दिवसापासून हे अतिक्रमण असले तरी हे हटविण्याचा प्रयत्नही मध्य रेल्वे विभाग आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून करण्यात आले नाही. यामुळे अनेक रेल्वेच्या जागेवर अनेक दुकानदार सर्रास अतिक्रमण करीत आहे.

  पुलाच्या अलिकडे आणि पलिकडेही अतिक्रमण
  कडबी चौक ते मोमीनपुरा मार्गावर दोन रेल्वे पुल आहेत. एक आरओबी आणि आरयुबी. पहिल्या आरओबी च्या आधीपासूनच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. आलमारीच्या कारखान्यापासून तर विविध दुकानांची रांग आरयुबी पर्यंत आहे. कोलकाता मार्गावरील आरयुबी संपताच कबाडीचे अतिक्रमण सुरू होते. एक या वळणावरून एक मार्ग रेल्वे स्थानकाकडे तर दुसरा मार्ग मोमीनपुरायाकडे जातो. रेल्वे स्थानकाकडे जाणारा संपूर्ण मार्ग भंगार विक्रेत्याने व्यापला आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145