Published On : Fri, Sep 4th, 2020

असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया -एपीईआय तर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

नागपूर/अमरावती/अकोला/ग़डचिरोली : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गरीब, होतकरू मुला-मुलींना शिक्षण घेण्यासाठी अडचणीना सामोरे जावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया (एपीईआय) ह्या संघटनेने सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अखंडीत शिक्षणाला हातभार लाभण्याच्या दृष्टीने मदत व्हावी याकरीता एपीईआयने एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड व पश्चिम बंगाल राज्यात सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकातील गरीब व होतकरू अशा 150 पेक्षा जास्त गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले आहे . या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी https://forms.gle/oxeunvRAxS8CrJCi9 या गुगल फ़ॉर्मवर तसेच apeipayback@gmail.com या ई-मेल वर आवश्यक माहिती भरून देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे करण्यात येत आहे. सदर शिष्यवृतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) आहे.

एपीईआयने गठीत केलेल्या समिती मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गेल्या वर्षी सत्कार करून प्रती विद्यार्थी 6 हजार रुपये याप्रमाणे मदत केली जाणार आहे. सदर शिष्यवृती देण्यासंदर्भातील सर्व अधिकार हे एपीईआय शिष्यवृत्ती समिती नागपूर कडे राहणार आहेत.

महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील विद्यार्थ्यांना यावर्षी शिष्यवृत्ती देण्याचे नियोजन असल्यामुळे दिलेल्या लिंकवर माहिती भरताना काही अडचणी निर्माण होत असल्यास खालील भ्रमणध्वनी क्रमांक वर संपर्क साधता येईल. नागपूर- (9975981464) , यवतमाळ- (9623853890) , पुणे- (7875500863), गडचिरोली-(8459068001) अकोला-(9822201150), चंद्रपूर-(7775086680) , अमरावती-(9421707948) ,अहमदनगर-(9284600673)

ह्या शिष्यवृत्तीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन डॉ. किशोर मानकर (भा.व.से.) तसेच प्रा. विलास तेलगोटे, डॉ. अंबिका टंडन, डॉ. भावना वानखडे, प्रा. नागसेन शंभरकर, कल्पना कांबळे, शितल सहारे, मिलिंद देऊळकर , राजन तलमले आणि रिमोद खरोले ह्यांनी केले आहे.

एपीईआय सामाजिक कार्यात अग्रेसर
कोविड-19 या महामारीच्या काळामध्ये असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया मार्फत 120 श्रमिक प्रवासी बांधवांना नागपूर रेल्वे स्थानकामधून त्यांच्या स्वगावी उत्तरप्रदेश व बिहार येथे परतण्यासाठी रेल्वेची तिकीट काढून आवश्यक मदतही करण्यात आली . या महामारीच्या कालावधीत गेल्या 4 ते 5 महिन्यापासून गरजूंना धान्य किट वाटप, भोजन व्यवस्था, ओआरएस पॅकेट, पेयजल वाटप, फळ वाटप तसेच पश्चिम बंगालच्या सुंदरबन येथे आलेल्या चक्रीवादळात प्रभावित कुटुंबीयांना आर्थिक मदत करणे, निवारा करिता ताडपात्री उपलब्ध करून देणे, कर्करोगाने पिडीत व आयसीयु मध्ये असलेल्या तरुणाला वेळेवर रक्तदान करणे, रक्तदान शिबीर आयोजित करणे तसेच स्थलांतरित कामगारांना भोजनदान असे अनेक सामाजिक मदतीचे कार्य एपीईआय ने केलेले आहेत व ते अविरर सुरु राहणार आहेत.