Published On : Mon, Mar 2nd, 2020

अनुसूचित जाती श्रमिक जनजागरण कार्यक्रम संपन्न.

कन्हान : – दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड नागपुर आणि संकल्प ग्रामोत्थान बहु. संस्था टेकाड़ी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रा.पं.वराडा येथे अनुसूचित जातीच्या श्रमिका करिता जन-जागरणास्तव दोन दिवसीय विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

ग्राम पंचायत भवन वराडा येथे कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रा पं सरपंचा सौ. विद्या चिखले यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड नागपुरचे शिक्षण अधिकारी प्रमोदजी रत्नपारखी, वैशाली संस्थाचे दामोदर रामटेके प्रामुख्याने उप स्थिती होते.

Gold Rate
May 05- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,48,800 /-
Gold 22 KT ₹ 1,38,400 /-
Silver/Kg ₹ 2,47,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिक्षण अधिकारी श्री रत्न पारखी हयानी सरकार द्वारे श्रमिकाच्या हितोंचे विविध नियम तसेच योजनाची माहिती विषयी मार्गदर्शन केले. श्री प्रका श ठाकुर, श्री दामोदर रामटेके, संकल्प संस्था सचिव अरविंद कुमार सिंह आदी ने विविध उपयोगी विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अल्का तेलोते यांनी तर आभार प्रदर्शन सरिता तेलंगे हयानी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement