Published On : Thu, Aug 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

करंट लागून मृत झालेल्या बंदराला कचरा गाडीतून नेल्याचा आरोप; सावनेर नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Advertisement

सावनेर : करंट लागून मृत झालेल्या बंदराच्या मृतदेहाची कथितरित्या नगर परिषदेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीतून ने-आण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सावनेरमध्ये समोर आला आहे. या घटनेमुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजता सावनेर येथे करंट लागल्याने एका बंदराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली. मात्र, मृत बंदराला सामान्य कचरा वाहून नेणाऱ्या वाहनातून नेले जात असल्याचा आरोप करण्यात आला.

Gold Rate
Sept 28,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 49,200 /-
Gold 22 KT ₹ 1,38,500 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकाराची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. त्यांनी कचरा गाडी थांबवून मृत बंदराला खाली उतरविले. त्यानंतर त्यांनी वन विभागाचे अधिकारी विजय गंगावणे यांना माहिती दिली.

माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मृत बंदराचा ताबा घेतला.

Advertisement

वन्यजीवाचा मृतदेह सामान्य कचऱ्यासोबत नेण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. मृत वन्यजीवांची सुरक्षित हाताळणी आणि नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाकडे योग्य व्यवस्था आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नगर परिषदेकडे अशी व्यवस्था असताना कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा वापर का करण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी नगर परिषद प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मृत वन्यजीवांच्या सुरक्षित हाताळणीसाठी स्पष्ट आणि नियमानुसार व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी केली आहे.

या घटनेमुळे सावनेर नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन याप्रकरणी काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.