Published On : Fri, Apr 19th, 2019

पिण्याचे पाणी वाचवा आणि काटकसरीने वापरा

नागपूर: नागपुरातील बर्याच भागामध्ये आजकाल हे चित्र फारच सामान्य झाले आहे …पिण्याच्या पाण्याने चार चाकी, दोन चाकी गाड्या धुणे, झाडांना, बगिच्याला पिण्याचे पाणी आणि देणे तसेच आता उन्हाळ्यात चक्क घरातील २/३ कुलर मध्ये सुध्धा पिण्याचेच पाणी भरभरून वापरणे. सुजाण नागरिक बरेच वेळा बुचकळ्यात पडतात, “काय हे लोक पण.. पाणी आणि ते हि चक्क पिण्याचे पाणी वाया च घालवीत आहेत, ते हि थोडे थोडके नव्हे …..हजारो लिटर …पाण्याची सतंतधार. आपण सर्वजन किती निष्काळजी झालेलो आहोत. सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा व्यय करीत आहोत. हेच पिण्याचे पाणी आपण वाचविले तर आपल्याला ह्याचा फायदाच होणार नाही का ? .

दररोज सकाळी नळ आला कि आपण कालचे शिळे (समजून) २/३ गुंड/बादली पाणी फेकून देतो आणि पुन्हा ताजे पाणी म्हणून २/३ गुंड, बादली पुन्हा पाणी भरतो ह्यामध्ये पुन्हा पाणी बेसिन मध्ये जाते आणि पुन: तोच प्रकार… गोष्ट अतिशय नॉर्मल अन कित्येकदा आपण स्वतः केलेलीही ….पण किती पाणी वाया जात आहे ह्याचा विचार न केलेली. अहो पिण्याचे पाणी कधीच शिळे होत नाही.

Advertisement

बर हे पिण्याचे पाणी नागपूरला येतं कुठून तर आपल्या पश्चिम, दक्षिण-पश्चिम , मध्य नागपूरला नवेगाव खैरी (पेंच नदी) आणि पूर्व, उत्तर आणि दक्षिण नागपूरला कन्हान नदीतून. साधारपणे नागपूर शहराला ६५० दश लक्ष लिटर पिण्याचे पाणी दररोज लागत.

नागपूर महानगर पालिका आणि OCW योग्य पाणी पुरवठा करिता संपूर्णपणे प्रयत्न करीत आहेत तसेच पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा ह्यासाठी प्रयत्नशील आहेच पण आपण देखील नागपूरचा जबाबदार नागरिक म्हणून सर्व नागपुर्कारणी होणार्या पाण्याचा अपव्यय थांबविणे ह्या करिता चळवळीत सहभाग नोंदविणे अत्यंत निकडीचे आहे.

पाण्याचा अपव्यय… हे सगळं थांबू शकतं, फक्त तुमच्या आणि माझ्या ओठातून येणाऱ्या “दोन” शब्दांनी.. मोजून दोन… कोणीही शेजारी किवा घरची व्यक्ती गाडी धूत असेल तर सांगा बादलीत पाणी घे ते हि विहिरीचे, बागकाम , फारशी धुणे, कुलर साठी पाणी – विहिरीचेच.

सकाळी नळ आला कि ताज पाणी भरायचे आणि शिळे फेकायचे हे न करता जेवढे वापरायचे तेवढे पाणी भरून ठेवू या आणि वापरू या. याने काय होईल तुम्हाला लागेल एवढंच पाणी तुम्ही घ्याल अन उरलेलं पाणी वाचेल.

पाणी वाचले म्हणजे महानगरपालिकेचं, महानगर पालिकेचं वाचलं म्हणजे नवेगाव खैरी धरणांचं अन कन्हान नदीचे धरणांचं वाचलं म्हणजे “आपलंच..!!” फार छोटी गोष्ट, फक्त दोन शब्द उच्चारायचेत पण तुमचे दोन शब्द तुमचेच कोटी लिटर पाणी वाचवू शकतात…लक्षात ठेवा ज्या प्रगत मानवजातीने, सेकंदाच्या दहाव्या भागाच्या प्रिसीजनने परग्रहावर माणूस यशस्वी उतरवलाय,, त्याच मानवजातीला अजून पर्यंत ‘पाणी’ मात्र निर्माण करता आलेलं नाहीये..मग आपण जे निर्माण करत नाही, ते कमीतकमी वाचवूयात तरी आणि काटकसरीने वापरू या तरी …तेही आपल्याच माणसांसाठी…!!
तर इथून पुढं, आता उन्हा उन्हाळा सुरु झालेला आहेच, ह्या उन्हाळ्यात नागपूर महानगर पालिका आणि …देखील नागपुरकर नागरिकांना आवाहन करीत आहे कि खालील उपाय योजना करून आपण पाणी नक्कीच वाचवू शकतो.जसे

१) कुलर मध्ये इतर पाण्याचा वापर करा (विहीर किवा विंधन विहीर),
२) गाड्या धुण्यासाठी इतर पाण्याचा वापर करा ,
३) बागकामासाठी, फारशी धुण्यासाठी इतर पाण्याचा वापर किवा पाण्याचा पुर्नवापर करा,
४) घरचे सर्व नळ पाईप्स, संप, तोट्या, ई.) बंद ठेवणे, नळ वाहू देऊ नये,
५) प्रत्येक नळ तोटी बसविणे आवश्यक आहे. आपल्या घरातील पुरेसे पाणी भरून झाल्यावर नळ बंद करावा. आपल्या घरातील पाण्याची टाकी, बाथरूम, शौचालय , वाश बेसीन मधील नळाला गळती असल्यास टी देखील दुरुस्त करून घ्यावी.
६) कुठे जलवाहिनीवरील गळती आढळ्यास त्वरित प्रशासनाला सूचना देणे.
७) शहरातील पाणीपुरवठा जलवाहिनी वर गळती निदर्शनास आल्यास त्वरित १८००२६६९८९९ ह्या क्रमाकावर संपर्क साधावा, माहिती द्यावी.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement