Published On : Thu, Feb 25th, 2021

विषय समिती सभापतींसाठी शनिवारी नामांकन; १ मार्चला निवडणूक

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी शुक्रवार २६ फेब्रुवारी रोजी नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार असून यासाठी होणारी निवडणूक १ मार्च रोजी विविध समित्यांसाठी ठरवून दिलेल्या वेळेत पार पडेल.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार विविध विषय समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती, विधी व सामान्य प्रशासन विशेष समिती, शिक्षण विशेष समिती, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समिती, क्रीडा विशेष समिती, महिला व बालकल्याण विशेष समिती, जलप्रदाय विशेष समिती, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती, अग्निशमन व विद्युत विशेष समिती आदी समितींचा समावेश आहे. सर्व समितींच्या सभापती व उपसभापती पदासाठी शुक्रवार २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मनपा मुख्यालयातील स्व. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात उमेदवारांना नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. उमेदवारांची यादी उक्त वेळेनंतर सचिव कार्यालय येथे प्रकाशित करण्यात येईल.

सभापती, उपसभापती पदांसाठी १ मार्च रोजी स्व. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात विविध समित्यांसाठी ठरवून दिलेल्या वेळेत जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे निवडणूक होईल.

स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची निवडणूक सकाळी ११ वाजता, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीची निवडणूक सकाळी ११.२० वाजता, विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीची निवडणूक सकाळी ११.४० वाजता, शिक्षण विशेष समितीची निवडणूक दुपारी १२ वाजता, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीची निवडणूक दुपारी १२.२० वाजता, क्रीडा विशेष समितीची निवडणूक दुपारी १२.४० वाजता, महिला व बालकल्याण विशेष समितीची निवडणूक दुपारी १ वाजता, जलप्रदाय विशेष समितीची निवडणूक दुपारी १.२० वाजता, कर आकारणी व कर संकलन विशेष समितीची निवडणूक दुपारी १.४० वाजता तर अग्निशमन व विद्युत विशेष समितीची निवडणूक दुपारी २ वाजता पार पडेल, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी दिली.