सातारा : शहरातील सदर बाजार परिसरातील लक्ष्मी टेकडी भागात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे झाडे तसेच विद्युत खांब कोसळून जवळपास ४० घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक कुटुंबांच्या घरातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले.
अचानक आलेल्या वादळी पावसामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. काही घरांची पत्रे उडून गेली असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी रात्री उशिरा अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावर पडलेली झाडे हटवणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आणि नागरिकांना त्वरित मदत पोहोचवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.
नुकसानग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने मदत केली जाईल, असेही नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी यावेळी स्पष्ट केले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate





