Published On : Mon, Mar 30th, 2020

सरपंच प्रांजल वाघ ने गावात केले मोफत धान्य वाटप

कामठी :-गावात कुणीही अन्नविना भूकेला राहू नये यासाठी कढोली ग्रामपंचायत सरपंच प्रांजल राजेश वाघ यांनी स्वखर्चातून गावातील गोरगरीब व गरजू नागरिकांना अकरा प्रकारचे जीवनावश्यक असलेले धान्याचे किट वाटप करून आपल्या सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला असल्याने या स्तुतत्य व प्रेरणादायी कामाबद्दल सरपंच प्रांजल वाघ व कुटुंबीय सदस्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोरोना विषाणूचा प्रदूर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉक डाऊन केले .देश वाचविण्यासाठी व देशाच्या चांगल्या आरोग्यासाठी कठोर पाऊल उचलणे काळाची गरज होतो .संपूर्ण लॉकडाऊन म्हटल्यास सर्वच थांबलं, वाहतूक थांबली, कामधंदे थांबले, मग ज्याचे हातावर आणून पोट भरते त्यांचं काय?त्यांच्या घरात चूल कशी पेटणार ?अशा परिस्थितीत त्यांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने आदर्श सरपंच प्रांजल राजेश वाघ यांच्या विचरसरणीतून गावातील अतिशय गरीब व गरजू प्रति कुटुंबाना 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 1 किलो तूर दाळ, 1 किलो चना दाळ, 1 किलो तेल, 1 अंघोळी ची साबण, 1 कापड धुणे साबण, 1 बिस्कीट पाकीट, हळद, तिखट चे पाकीट, 1मिठाचे पाकीट या 11 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले या प्रकारचे कर्तव्य तालुक्यातील कुठल्याही सरपंचाने केले नसल्याने सरपंच प्रांजल वाघ ने स्वखर्चातून केलेले या कर्तव्यच तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे तसेच वाटप करताना शासनातर्फे लागू असलेला कलम 144 चे देखील पालन करण्यात आले.

ही 11 प्रकारच्या अन्नधान्याची किट तयार करण्यात सरपंच प्रांजल वाघ, राजेश वाघ, मीनाक्षी वाघ, संदीप वणवे, किशोर कडू, दिनेश वाघ, सोनू वाघ,दिनेश गावंडे तसेच बालकवर्गातील ज्ञानेश राजेश वाघ, विग्नेश राजेश वाघ, शौर्य, कुणाल, लकी, यांनी सुद्धा सहभाग नोंदवीत समाजसेवेत भर घातली.