| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Feb 15th, 2018

  राजधानीत संत सेवालाल महाराज जयंती साजरी

  नवी दिल्ली: संत सेवालाल महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.

  कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त व प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रधान सचिव व आयुक्त गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

  महाराष्ट्र परिचय केंद्रात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

  महाराष्ट्र परिचय केंद्रात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145