Published On : Sat, Feb 23rd, 2019

संत गाडगेबाबा महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नागपूर: संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, अविनाश कातडे, रविंद्र कुंभारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, तसेच अधिकारी, कर्मचारी यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

विभागीय आयुक्त कार्यालय
संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उपायुक्त संजय धिवरे यांनी अभिवादन केले. यावेळी चौकशी अधिकारी शैलेंद्र मेश्राम, तहसिलदार श्रीराम मुंदडा, स्विय सहाय्यक पंकज बोरकर तसेच अधिकारी, कर्मचारी यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.