दक्षिण नागपुरातील संजयनगर चौक ते पिपळारोड या रस्त्याच्या कामासाठी अतिरिक्त अंदाजपत्रकात 17 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. दक्षिण नागपुरातील जनतेची ही बऱ्याच काळापासूनची मागणी होती. आ. सुधाकर कोहळे यांनी या निधी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला.
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या 2019-20 च्या अतिरिक्त अंदाज पत्रकात या रस्त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आली. याबद्दल आ. कोहळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस, सार्व.बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे दक्षिण नागपूरातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.
Advertisement

Advertisement
Advertisement