Published On : Thu, Apr 16th, 2020

नगरसेवक संदीप गवई यांचे कडून पोलीस बांधवाना मास्क आणि सॅनिटायजर चे वाटप

स्वतःची पर्वा न करता नेहमी कर्तव्यदक्ष 24 तास जनतेच्या रक्षणसाठी तत्परतेने कार्य करणारे बेलतरोड़ी पोलीस स्टेशन व अजनी पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी आजही कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व आपल्या परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याकरिता अहोरात्र ड्यूटी करत आहेत. त्यांच्या या कर्तुत्वाला सलाम. या पोलीस बांधवांच्या प्रकृतीच्या काळजीसाठी बेलतरोडी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस उपायुक्त श्री मराठे साहेब व पोलीस निरीक्षक श्री आकोत साहेब तसेच अजनी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ निरीक्षक श्री खांडेकर साहेब यांना संपूर्ण पोलीस स्टेशन च्या अधीकारी व कर्मचारी यांच्या साठी मास्क व सॅनिटायझर ची मदत नगरसेवक संदीप गवई करण्यात आली.