Published On : Thu, Oct 14th, 2021

संदीप आवारी यांनी स्वीकारला स्थायी समिती सभापतीपदाचा पदभार

Advertisement

– पुष्पा उराडे व शितल कुळमेथे यांनीही केले पदग्रहण

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे नवनियुक्त सभापती संदीप आवारी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून पुष्पा उराडे व उपसभापती म्हणून शितल कुळमेथे यांनी गुरुवारी (ता. १४) आपापल्या कक्षात स्थानापन्न होत पदभार स्वीकारला.

Advertisement

मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत एका छोटेखानी कार्यक्रमात महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मावळते स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे मुख्य उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला.

संदीप आवारी हे मागील अनेक वर्षांपासून भाजपचे नगरसेवक असून, यापूर्वी उपमहापौर व सभागृह नेता ही पदे त्यांनी भूषवली आहेत. दरम्यान महिला व बालकल्याण समिती कक्षात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभापती म्हणून पुष्पा उराडे व उपसभापती म्हणून शितल कुळमेथे यांनीही पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्याला नगरसेवक, नगरसेविका आदींची उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement