Published On : Fri, Oct 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

समृद्धी महामार्ग की ‘मृत्यूचा मार्ग’? सात जणांच्या मृत्यूनंतर वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

Advertisement

Midnight firing in air from car in Nagpur; accused arrested from Wani

नागपूर : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून १९ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या घटनांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी समृद्धी महामार्ग आता ‘समृद्धी’ऐवजी ‘मृत्यूचा मार्ग’ बनत असल्याची टीका केली. घाईघाईत करण्यात आलेले काम आणि कथित कमिशनखोरीमुळे महामार्गाची अवस्था खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला. अपघातांची नेमकी कारणे शोधून त्यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.

दोन वर्षांत शेकडो मृत्यू-

समृद्धी महामार्गावरील अपघातांचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी गेल्या दोन वर्षांत सुमारे ६५० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. दरम्यान, उपलब्ध सरकारी आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत या महामार्गावर १४२ अपघातांत १२८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने किमान १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. केवळ धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे किंवा बचाव पथके तैनात करणे पुरेसे नसून अपघात रोखण्यासाठी प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी म्हटले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.