Published On : Mon, Jan 7th, 2019

साटक ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे बक्षीस वितरणासह समारोप

कन्हान : – शिक्षण विभाग पंचायत समिती पारशिवनी आणि अखिलेश हायस्कूल साटक यांच्या संयुक्त विद्यमाने साटक येथे शाळेच्या पटांगणात तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात बक्षीस वितरणासह समारोप करण्यात आला .

अखिलेश हायस्कूल साटक येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०१८-१९ च्या बक्षीस वितरणासह समारोप कार्यक्रम ग्रा प सरपंचा सौ सिमाताई यशवंतराव उकुंडे यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी प स सदस्या मा पुण्यशिला मेश्राम, गट विकास अधिकारी मा प्रदीप कुमार बम्हनोटे, गटशिक्षणाधिकारी मा विकास काटोले, प्र शि वि अधिकारी योगेश ठाकरे, केंद्र प्रमुख एनआर बेले, मुख्याध्यापक सुदाम पाटील, विलास मेश्राम आदी मान्यवरां च्या हस्ते प्राथमिक गटात प्रथम प्रणय ढगे पालीवाल विद्यालय पारशिवनी, द्वितीय महेश पुरी नारायणा विद्यालय कन्हान, तृतीय कु अंजली पाटील जि प शाळा बनपुरी , माध्यमिक गटातुन प्रथम प्रणय निनावे हरिहर विद्यालय पारशिवनी, व्दितीय आकाश चौरसिया धर्मराज विद्यालय कन्हान, तृतीय अमन शेख नुतन विद्यालय टेेकाडी कांद्री हयाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या प्रदर्शनात ५७ विज्ञान प्रतिकृती सहभागी होत्या सर्वाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकातुन शा पो आ अधिक्षक व वि अधिकारी कैलास लोखंडे हयानी विज्ञान प्रदर्शीनीचे महत्त्व सांगितले.

Advertisement

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनमोल मेश्राम सर हयानी तर आभार प्रदर्शन प्रशांत हुमणे यांनी व्यकत केले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता पंचायत समिती पारशिवनी, शिक्षण विभाग पारशिवनी मा योगेश ठाकरे केंद्र प्रमुख, अमुख्याध्यापक सुदाम पाटील, सर्व मुख्याध्यापक, गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी, अखिलेश हायस्कुल साटक चे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी मौलाचे सहकार्य केले .