Published On : Thu, Oct 17th, 2019

ऐतिहासिक मताधिक्याने विजय होणार समीर मेघे….. खासदार रविकिशन

नागपूर :- निलडो‍ह अमरनगर व वाडी येथील प्रचार सभेत समीर मेघे यांच्या समर्थनार्थ प्रमुख पाहुणे म्हणून आलेले खासदार रविकिशन यांनी हजोरोच्या संख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय पाहुन ऐतिहासिक मताधिक्याने समीर मेघेचा विजय निश्चित होणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. मागील 5 वर्षात दिवस-रात्र जनसामान्यांसाठी केलेल्या कामाचे फळ नजरेसमोर दिसत आहे, जणु काही त्यांचा विजय आजच झालेला असुन हा विजय जल्लोष असल्याचे भासत आहे अश्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

वंदे मातरम्, भारत माता की जय, जय घोषात रविकिशन यांनी समीर मेघे यांना आपला आशीर्वाद आणि 21 ऑक्टोबर रोजी होणा-या मतदानाच दिवशी आपली मते त्यांना द्या. वाडी येथील प्रचार सभेत बोलतांना देशास कधी-कधी नरेंद्र मोदी सारखे व्यक्ती आणि पंतप्रधान लाभतात, ज्यांची आई आजही 10 * 12 च्या रूम मध्ये राहते, एक भाऊ पेट्रोल पंपवर तर दुसरा भाऊ किराण्याचे दुकान चालविते. मी सुध्दा एक कलाकार होतो. माझे जीवन अतिशय आनंदात सुरू होते. सर्व सुख माझ्या पायाशी होते, परंतु नरेंद्र मोदीयांच्या देश सेवेच्या कार्याने मी प्रभावीत होऊन भाजपा मध्ये प्रवेश केला व या प्रवाहात आलो आहे. नरेंद्र मोदीजी म्हणजे साक्षात, जिवीत महादेव असून त्यांच्यासोबत अमितजी शहा यांच्या सारखे धैर्यशिल आणि कुणालाही न भिणारे नेते असल्यानेच पाकिस्तानला शिकविलेला घडा आपणास माहीतच आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात व सांगितलेल्या मार्गावर चालणारे समीरजी मेघे हे एक यशस्वी विधायक ठरले आहेत.

विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर आयोजीत होणा-या विजयी जल्लोषात सहभागी होण्यासाठी मी हिंगणा मतदारसंघात निश्चित येईल असे खासदार रविकिशन यांनी आश्वासीत केले. अमरनगर येथील प्रचारसभेस सुमारे 5 ते 7 हजार नागरीक उपस्थित होते. सर्व प्रथम त्यांनी जनतेस अभिवादन केले आणि वानाडोंगरी नगरपरिषद निवडणुकीपासून समीर मेघे यांच्याशी अत्यंत जवळची मैत्री झाली असल्याचे त्यांनी सांगितले. निलडोह अमरनगर येथील प्रचार सभेदरम्यान श्रीराम सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी खासदार रविकिसन यांच्या उपस्थितीत समीर मेघे यांना समर्थन घोषित केले.

वाडी येथील बंगाली भाषिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वाडी येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेस नरेशजी चरडे, सरिताताई यादव आणि मोठया संख्येने भाजपा व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. भ्रष्टाचारास नियंत्रण ठेवणारे भाजपा शासन आहे, आणि या भाजपा पक्षाचे पाईक समीरजी मेघे असल्यामुळे त्यांना आपली अमुल्य मते देण्याच्या आव्हान श्री. नरेशजी चरडे यांनी केले. सभेस संबोधीत करतांना मी देशातील एका गोड भाषिक लोकांच्यामध्ये बसलो असल्याच्या भावना समीर मेघे यांनी व्यक्त केल्या. आपण सर्व सुशिक्षीत आणि चांगल्या वाईटांचे ज्ञान असलेले नागरिक आहात, त्यामुळे समृध्द महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण मला मते देवून विजयी करा अशी विनंती त्यांनी केली. या प्रसंगी समीर मेघे यांचे निकटवर्तीय मित्र श्री. अभिजीत मुजुमदार यांनी बंगाली भाषेतून समीर मेघेंबद्दल माहीती दिली आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

निवडणूक प्रचारार्थ समीर मेघे यांनी मतदारसंघातील डिगडोह, ईसासनी, निलडोह, वानाडोंगरी, इंडोरामा कॉलनी (टाकळघाट) या ठिकाणी प्रचार रॅली काढली. या प्रचार रॅलीत महिला अग्रेसर व उत्स्फूर्त असल्याचे दिसून आले. अंबादास उके, सुरेश काळबांडे, श्रीमती कोटगुले, कृपाशंकर गुप्ता, विनोद ठाकरे, आदर्श पटले, छायाताई क-हाडकर, आबा काळे, सचिन मेंडजोगे, नितीन साखळे यांच्यासह मोठया संख्येने नागरिक प्रचार रॅलीत होते.