Published On : Thu, Sep 28th, 2017

मुंबई येथील नॅशनल टूर्नामेंट मध्ये संभाजी ब्रिग्रेड कराटे क्लब ची उत्कृस्ट कामगिरी

वाडी (अंबाझरी):प्रियदर्शिनी स्पोर्ट क्लब तर्फे मुंबई येथे नुकताच 6 ते 24 वर्षे वयोगटातील मुला मुलींकरिता नॅशनल टूर्नामेंट कराटे स्पर्धाचे नुकताच आयोजन करण्यात आले होते,या स्पर्धेत संभाजी ब्रिगेट कराटे क्लब नागपूर जिल्हा अंतर्गत वाडीतील कराटे स्पर्धकांनी भाग घेतला होता,

यामध्ये उत्कृस्ट कामगिरी करून या स्पर्धकांनी एक सुवर्ण पदक,चार सिल्वर पदक,आणि नऊ ब्राँझ पदके पटकाविले,विजयी स्पर्धकांमध्ये कु,ख़ुशी गुप्ता हिला सुवर्ण पदक मिळाले, संदीप बागडे याने ब्लॅक बेल्ट सह सिल्वर पदक मिळविले,अन्वर कोंगे अनशीत कायरवार व सम्यक सहारे यांनी सिल्वर पदक मिळविले,शबरी वासनिक, जागृती सोनटक्के,तनवी गोविंदवार, नयन गिरीपुंजे, रितेश कोकाटे,आयुष चौधरी,प्रज्वल मांडवगडे,प्रशक्षक सेन्सई रानु सोनटक्के,मनीष येवले यांना ब्राँझ पदके देऊन गौरव करण्यात आला, अमित शर्मा व पी एस बन्सोड यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात

या स्पर्धकांनी केलेल्या उत्कृस्ट कामगिरी बद्दल वाडीत संभाजी ब्रिगेट जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर येवले,जिल्हा संघटक अंकुश बुरंगे, जिल्हा प्रवक्ता संगीता येवले,अमोल देशमुख, अभिजित दळवी,निशांत कोल्हे,समीर जाधव, नंदू ढोके,मनोज चटप,राजाभाऊ जोध,राकेश तिडके, राहुल कोलते,पंकज फालके,अंकुश गोडबोले,उत्कर्षा येवले,दीप्ती जोध, रोहित माने,प्रमोद वैद्य,पंकज निंबाळकर आदींनी अभिनंदन करून पुढील भाविष्याकरिता शुभेच्छा दिल्या,