| | Contact: 8407908145 |

    संभाजी भिडेंना अटक करण्याच्या मागणीसाठी आम. प्रकाश गजभियेंचे अनोखे आंदोलन

    नागपूर : भीमा – कोरेगांव दंगल प्रकरणात आरोपी असलेले संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी संभाजी भिडेंच्या वेशभूषेत विधानभवन परिसरात प्रवेश करून अनोखे आंदोलन केले.

    यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना गजभिये म्हणाले की, देशाच्या संविधानापेक्षा कुठलीहीगोष्ट मोठी नाही. संविधांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे घटनेने दिलेल्या कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. मात्र सरकार संभाजी भिडेंची पाठराखण करत आहे. त्यांनी कायद्याचा फज्जा उडविला असून, सर्वाना समान न्याय द्यावा आणि त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी गजभिये यांनी यावेळी केली.

    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145