Published On : Sat, Jul 7th, 2018

पुण्याच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार संभाजी भिडे ; वादाची शक्यता

Advertisement

पुणे : पुण्यात शनिवारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे . शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे स्वयंसेवकासह संचेती हॉस्पिटलच्या बाजूच्या पुलावरून दोन्ही पालख्याच्या दिंडी मागे सहभागी होणार असल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे .

गेल्या वर्षी देखील पुण्यात ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह सुमारे एक हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement
Advertisement

फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यापैकी काहीजणांकडे तलवारीही होत्या. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत असून या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे गुरुजी सहभागी होणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे स्वयंसेवक पराशर मोने यांनी दिली. आम्हाला कोणीही परवानगी नाकारली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्वयंसेवक सहभागी होतील, असे ते म्हणालेत. दुपारी पावणे चारच्या सुमारास ते सोहळ्यात सहभागी होतील.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement