नागपूर:- बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्था २५ व्य रौप्य महोत्सवा निमित्त समाजातील आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरिकांचे समाजभूषण व कृषिभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.रामनगर,नागपूर येथील बावणे कुणबी समाज सभागृहात पार पडलेल्या समारंभात कार्यक्रमाचे उदघाटक रत्नाकर ठवकर (अध्यक्ष,श्रीक्षेत्र अंभोरा देवस्थान) हे होते तर अध्यक्ष म्हणून समाजभूषण बी.के.ठवकर तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ.परिणय फुके,माजी खासदार नाना पटोले,माजी आमदार मोहन मते,डॉ.हरीश धुरट,राजू भोतमांगे प्रामुख्याने उपस्तिथ होते.
या प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना आमदार डॉ.परिणय फुके म्हणले कि समाजातील नागरिकांची मागणी असते कि आपण आम्हाला समाज भवन निर्माण करण्याकरिता निधी देण्यात यावा.पण जेव्हा मी या समाज भवन संदर्भात चौकशी केली तर ते फक्त लग्न समारंभ करिता उपयोगी असतात.उरलेले दिवस हि वास्तू पडीत असते त्यापेक्षा समाजातील विध्यार्थ्याकरिता वाचनालय,वसतिगृह किंवा सांस्कृतिक व्यासपीठ तयार करण्यात यावेत.
ज्यामुळे समाजातील विध्यार्थी आय.ए.एस.,आय.पी.एस.,डॉक्टर,इंजिनियर,वकील,तहसीलदार इत्यादी क्षेत्रात आपले व आपल्या समाजाचे नावलौकिक करतील. समाजातील तरुण हे आय.ए.एस.,आय.पी.एस.,डॉक्टर,इंजिनियर,वकील,तहसीलदार झालेत तर इतर तरुणांना प्रेरणा मिळेल.सर्व समाजबांधवांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊन समाजासाठी कार्य करण्याची गरज आहे.सकल कुणबी समाज हे आपले उद्धिष्ट असले पाहिजे.शेतकऱ्यांनी आपल्या शेता मध्ये विविध प्रयोग करण्याची गरज आहे.शेतकऱ्यांनी शेती सोबत जोड धंदा केला पाहिजे.माझ्या कडून समाजाच्या हिता करिता जी
काही मदत लागेल ती सर्वोपरी करण्यास तयार आहे.
यावेळी माजी खासदार नाना पटोले,माजी आमदार मोहन मते,डॉ.हरीश धुरट,रत्नाकर ठवकर व बी.के.ठवकर यांनी सुद्धा आपले विचार मांडलेत. याप्रसंगी समाजभूषण पुरस्कार प्रभाकर ठवकर (नागपूर),श्रीराम टिचकुले (भंडारा),पांडुरंग बांडाबुचे (अमरावती),मुकुंदराव निंबार्ते (पुणे) व दिनकरराव भोयर (वर्धा) यांना देण्यात आला तसेच कृषिभूषण पुरस्कार निशिकांत इलमे (भंडारा),पुरुषोत्तम भोयर (नागपूर),भोजराज चारमोडे (नागपूर),कृष्णराव गोमासे (वर्धा) व प्रदीप मोहतुरे (अमरावती) यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनील कुकडे यांनी केले,प्रास्ताविक के.टी.मते यांनी केले तर आभार डॉ.विलास रेहपाडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शालिकराम कुकडे,बाबारावजी तुमसरे,हरिभाऊ मोटघरे,हरिभाऊ बांते,ममता भोयर,विना कुकडे,दुर्योधन अतकारी,प्रभाकर सेलोकर,सुरेश निंबार्ते,प्रभुजी मने,गणेश वनवे,प्रशांत गोमासे,प्रकाश खराब आदींनी अथक परिश्रम घेतले.