Published On : Mon, Aug 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गुन्हे शाखेची कारवाई; १.३०० किलो गांजा जप्त, आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : शहरातील अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग देत गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सक्करदरा परिसरात मोठी कारवाई करत १ किलो ३०० ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एनडीपीएस कायद्यांतर्गत अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला तडीपार सराईत फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्टच्या रात्री मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी भोसले नगर झोपडपट्टी परिसरात, महाकाली शीतला माता मंदिराजवळ छापा टाकण्यात आला. या कारवाईत १.३०० किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ३२ हजार ५०० रुपये आहे.

Gold Rate
Aug 3 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणात विकी रमेश दुबे (रा. राणी भोसले नगर झोपडपट्टी, सक्करदरा) याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याच्याविरुद्ध यापूर्वीही सक्करदरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.

या गुन्ह्यात असलम खान ऊर्फ भुरू दाऊद खान यालाही आरोपी करण्यात आले असून तो सध्या फरार आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत तीन गुन्हे दाखल असून तो सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

Advertisement

या प्रकरणी पोलिस हवालदार अरविंद बेडेकर यांच्या तक्रारीवरून एनडीपीएस कायद्यातील कलम ८(अ), २०(ब)(२)(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सक्करदरा पोलीस करत आहेत.

पोलीस उपायुक्त (गुन्हे) दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेने स्पष्ट केले.

Advertisement
सहस्रकुंड जलप्रपात उफान पर, पर्यटकों की भारी भीड़ #maharashtranews #nanded #newsupdate #maharashtra

सहस्रकुंड जलप्रपात उफान पर, पर्यटकों की भारी भीड़ #maharashtranews #nanded #newsupdate #maharashtra

"रेशीमबाग से निकले, पातालयंत्री स्वभाव के"

"रेशीमबाग से निकले, पातालयंत्री स्वभाव के"

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

निर्मल उज्ज्वल के प्रमोटर के घर पहुंचे जमाकर्ता | "हमारा पैसा वापस करो" | Nagpur News | Viral Video

निर्मल उज्ज्वल के प्रमोटर के घर पहुंचे जमाकर्ता | "हमारा पैसा वापस...

NagpurCrime : नागपुर में काली बाइक गैंग का आतंक; एक दिन में 3 जगह वारदात #Nagpur #NagpurNews #Crime

NagpurCrime : नागपुर में काली बाइक गैंग का आतंक; एक दिन में...

Amravati: दर्यापुर के ज्वेलर्स में हथियारबंद डकैती #Amravati #jewellery  #Robbery #Crime #Robbery

Amravati: दर्यापुर के ज्वेलर्स में हथियारबंद डकैती #Amravati #jewellery #Robbery #Crime #Robbery

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges