Published On : Thu, Mar 23rd, 2017

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुची छेडछाड, आरोपी तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई – संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणा-या ‘सैराट’ सिनेमातील अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरु हिचे राज्यातच नाही तर देशभरात लाखो चाहते आहेत. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी हे चाहते उतावळे असतात. मात्र, सोलापुरातील अकलूज येथे एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.

सैराट फेम अभिनेत्री आर्ची अर्थात रिंकू राजगुरु हिची एका तरुणाने छेड काढल्याची घटना समोर आली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रिंकूची छेड काढल्याप्रकरणी अकलूज पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला पूढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

अकलूजमध्ये छेडछाड झाल्यानंतर अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याला माळशिरस येथील दिवाणी न्यायालयात आरोपीला उशिरा हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या दहावीची परीक्षा देत आहे. सैराट सिनेमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सैराट सिनेमाच्या कन्नड रिमेकमध्येही मुख्य भूमिका साकारत आहे